natphotojournal

/ Vivek Kale Nature Photography
 

 
 


 

निसर्ग चित्रमाला
Nature Photography - Journal
April 2011, May 2011, June 2011 (3 journals)
Please use minimum 1280 pixel horizontal screen resolution for viewing. Please be patient while all the images in webpage are loaded.
Please do not use the images for any commercial use without permission. Text in Marathi and English is not exact translation.
 
आपण भारतासारख्या निसर्ग विविधतेने नटलेल्या देशाचे नागरीक आहोत, हे भाग्य आहे. आपल्या देशातील विविध प्रांतवार हवामान, व अधिवासाचे विविध प्रकार यामुळे, येथे नाना जातीचे पक्षीगण आढळतात. भारतात अंदाजे १२०० जातीचे पक्षी आढळतात. आपल्या महाराष्ट्र राज्यातच यातील ५५० जातीचे पक्षी दिसतात. यातील बरेच पक्षी स्थानिक आहेत. तर काही जातींचे पक्षी हिवाळ्यात आपल्या कडे पाहुणे असतात. दुर्दैवाने आपल्या वेंधळट प्रगती, औद्द्योगिकरणामुळे आपली निसर्ग संपत्ती लोप पावत आहे. प्रदुषण, जंगलतोड, शिकार व हवामान बदलांमुळे बरेच पक्षी दुर्मिळ होत आहेत. शहरात चिमण्या, गावाकडे गिधाडे, माळरानावरचा माळढोक, असे खुप जातीचे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मनुष्यप्राणी हा जसा बर्याचदा मारक ठरतो तसाच तो तारक सुद्धा होऊ शकतो.
India is a land with wide range of weather conditions and habitats. Various types of avian fauna is seen in India. About 1200 species of birds are seen in India. Many of these birds are resident birds of India, some are the migratory birds which travel from central asia in winter. Unfortunately due to chaotic haphazard policies of urban development and human wildlife conflicts, India is loosing fauna species rapidly. The Great Indian bustard from the arid grasslands, the vulture species and many other birds are endangered due to human activities disturbing the important links in our ecosystem.
 

 

<
Alcippe poioicephala, Brown-cheeked Fulvetta, Under growth of evergreen forest, western ghats, Maharashtra, Pune district, Feb 2011
 
फुलवेट्टा प्रकारातील एक फिक्या रंगाचा गाणारा पक्षी आपल्याकडे सदाहरित रानात आढळतो. अंदाजे १५ से.मी. आकाराचा हा लहान पक्षी सदाहरित रानातील स्थानिक पक्षी आहे. दक्षिण भारतात व बांगलादेशात तो आढळतो. याच पक्ष्यास पुर्वी क्वेकर बॅबलर असे संबोधन होते. भीमाशंकर, महाबळेश्वर च्या रानात छोट्या गटागटाने गुणगुणत फिरणारे हे पक्षी हमखास दिसतात.
Brown cheeked fulvetta is a common bird seen in the evergreen forests and deciduous forests in western ghats and hills of south India and Bangladesh. It was earlier known as quaker babbler. The birds are seen in the undergrowth and are seen in a small flock. It is about 15 cm in size. (The call link by David Farrow - Xento-canto.org)
 

 

<
Alcippe poioicephala, Brown-cheeked Fulvetta, Under growth of evergreen forest, western ghats, Maharashtra, Pune district, Feb 2011
Habitat : Evergreen forests, occasional
इतर फुलवेट्टा प्रकारच्या पक्ष्यांप्रमाणे, या पक्ष्यामध्ये अंगावर कुठेही ठसठशीत खुणा नसतात. त्याचे रंग फिके असतात. त्याचा रंग फिका तपकिरी असतो. त्याचे डोके वरिल भागात निळसर राखी रंगाचे असते. डोळे राखी रंगाचे असतात. चोच त्याच रंगाची असते. इतर रानपक्ष्यांप्रमाणे ते मधुर शिट्ट्या वाजवत एकमेकाच्या संपर्कात रहातात. रानातील फुलांतील मध व किडे हे त्यांचे आवडते खाद्य होय. उन्हाळ्यात क्वचित हे पक्षी पाणवठ्यावर अंघोळ करताना दिसतात.
Unlike other fulvetta species it has no patterns on its wing and head. The bird is light brown in color with grey crown. Its legs are greyish. The iris is slaty grey. The bill is bluish. The birds are seen in undergrowth of thick evergreen forests. Like most of the forest birds, these birds use calls to communicate with each other. Brown cheeked Fulvetta feeds on insects and nectar.
 

 

<
Coturnix coromandelica, Rain Quail,पावसाळी दुर्लाव, dry grassland and semidesert region, Maharashtra, Pune district, February 2011
Habitat : Semidesert region and dry grassland, common
गावाकडे माळावर फिरताना दुर्लाव जातीचे गवतात चरणारे, आपण जवळ पोहोचता अचानक भर्रकन भरारी मारतात. अचानक झालेल्या आवाजाने व हालचालीने आपणच क्षणभर दचकतो. गवतात लपुन चरणारा असाच एक पक्षी आहे, पावसाळी दुर्लाव. त्याच्या रंगछटेमुळे तो गवतात खुप जवळुन पाहिले तरी दिसत नाही. हे पक्षी कोरड्या माळरानावर व गवताळ प्रदेशात प्रामुख्याने आढळतो. नर व मादी पक्ष्यांमध्ये फरक असतो. याच प्रकारामध्ये मोडणाऱ्या साध्या दुर्लाव पक्ष्यात व पावसाळी दुर्लावात साधर्म्य असते ते मादीत. नर मात्र वेगळे दिसतात. पोटावरच्या काळ्या रंगाच्या खुणा व डोक्यावरच्या ठळक खुणा हे पावसाळी दुर्लावाचे वैशिष्ट्य. पावसाळी दुर्लावांचा पावसाळ्याचा उत्तरार्ध विणीचा हंगाम असतो. मोकळ्यावर झुडुपाखाली हे पक्षी आपली अंडी उबवतात. व्हिट व्हिट व्हिट व्हिट असा यांचा आवाज हे यांचे वैशिष्ट्य आहे.
The experience with quails is always very interesting. These birds are well camouflaged with its habitat. Often a group of quails fly from below our feet while wandering in the wilderness. Rarely one gets opertunity to see them from close while they are in grass. These birds are seen in grassland, fields and scrubs in planes in India. The common quails and rain quails are very similar except some differences in male bird. The male rain quail has a black breast-patch and distinctive head pattern of black and white. female common quail and female rain quail look almost the same. As the name suggests, these birds breed just after the rainy season. These Quails are considered locally migratory. In every way this little Quail resembles the Common Quail, but its note is a musical " whit-whit-whit-whit," constantly repeated. So next time you see a quail in wilderness take care to listen it carefully. The bird calls mainly in breeding season. These birds lay their eggs in open under the bush. (The call link by Martin Fowlie - Xento-canto.org)
 

 

<
Coturnix coromandelica, Rain Quail,पावसाळी दुर्लाव, dry grassland and semidesert region, Maharashtra, Pune district, February 2011
Habitat : Semidesert region and dry grassland, common
साध्या दुर्लवापेक्षा पावसाळी दुर्लावाच्या डोक्यावरील खुणा अत्यंत ठळक काळ्या असतात. मधील पांढरे पट्टे सुद्धा स्वच्छ सफेद असतात. डोळ्यांचा रंग गडद तपकिरि असतो. पायांचा रंग करडा असतो. तर चोच काळी असते.
The Upper plumage, wings and tail of the rain quail male are same as in the Common Quail but rather richer and deeper in tint The primaries and outer secondaries are brown, edged pale but with no bars. The head, chin and throat differ from the Common Quail in having broad, more jet-black bars and the intermediate spaces very pure white. The centre of breast and upper abdomen is black. The iris is deep brown colored. The bill is black in the breeding-season and horny black and paler at the base in nonbreeding and young birds. The legs and feet are fleshy-grey, and turn pinkish in the breeding-season.
 

 

<
Flycatchers of Sahyadri, नाचण पक्षी , semi deciduous and evergreen forest, Maharashtra, Pune district
Habitat : semi deciduous and evergreen forest, occasional
पुण्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या रांगांमध्ये मोजकी सदाहरित व पानगळी रानं शिल्लक राहिली आहेत. नाचण जातीचे रंगीत रानपक्षी या रानांमध्ये आढळतात. यातील काही स्थानिक तर काही स्थलांतर करणारे पक्षी आहेत. राननिळा सदाहरित रानात रहाणारा स्थानिक पण दुर्मिळ पक्षी आहे. तर सफेद भुवईवाला गडद निळा नाचण हिवाळ्यापुरता हिमालयाच्या पायथ्यापासुन सह्याद्रीत येणारा नाचण पक्षी आहे. नाचण पक्षी माशीमार म्हणुन सुद्धा ओळखले जातात. रानातल्या पानगळीत, पाण्यात आढळणारया माश्या पकडणे व खाणे हा या पक्ष्यांचा आवडता उद्योग आहे.
Around Pune, there are some semi deciduous and semi evergreen forests, in western ghat hills. The flycatchers are seen in and around these last patches of forest. Some of them are resident and some are migratory. White bellied blue flycatcher is seen in the evergreen forest, whereas winter visitor like ultramarine flycatcher is occasionally seen bird. The birds are often seen at the waterholes busy for hunting the flies. The rapid movements of these birds while hunting give the feel of dance. In Marathi these birds are called as Nachan or Nachra meaning those who dance.
 

 

<
Endangered region, Telbaila Wall mountain, Maharashtra, Pune district, Jan 2011
Habitat : semi deciduous forest and evergreen forest
तेलबैला ची भिंत हा सह्याद्री पर्वतमालेतील एक अनोखा डोंगर आहे. पुणे जिल्ह्यात दख्खन च्या पठारावर एका कोपऱ्यात असलेले हे ठिकाण म्हणजे कातळारोहण करणाऱ्या गिऱ्यारोहकांची पंढरी होय.
Tel baila or Tel bela is a singular unusual volcanic wall structure in North western ghats, in Pune district. It is located at the edge of the deccan platue. It is known as Mecca of experienced rock Climbers in Sahyadri hills.
 

 

<
Endangered region, Telbaila Wall mountain, Maharashtra, Pune district, Jan 2011
Habitat : semi deciduous forest and evergreen forest
तेलबैलाच्या डोंगराची उंची अंदाजे २५०० फ़िट आहे. तेथे एक देवालय, व पाण्याची टाकी आहे. डोंगराच्या वर कातळ भिंत आहे. कातळाची उंची २०० फिट असुन त्याची लांबी ६०० फिट आहे. वैशिष्ट्य म्हणजे या भिंतीची जाडी अवघी १० ते २० फिट आहे. डोंगराच्या एका कडेस कोकणात उतरणारा सवाष्णि घाट असुन परिसरात पानगळीचे व सदाहरीत वनाचे उत्तम नमुने आहेत. दुर्दैवाने हा नैसर्गिक ठेवा माणसाच्या प्रगतीकरणाच्या वेडात नष्ट होणार असे दिसु लागले आहे. उच्चभ्रु लोकांसाठी राज्य सरकारने अलिकडेच हा भाग खाजगी शहरीकरणाच्या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पासाठी विकला आहे. यामुळे येथील कातळ, रान व निसर्ग धोक्यात आला आहे. तेथे जाण्यासाठी सर्वसामान्यांना मज्जाव होणार अशी चिन्हे दिसु लागली आहेत.
The wall is about 600 feet wide, 200 feet tall and about 10-20 feet thin. The altitude of the base of the wall is about 2500 feet above msl. The region is sparesely populated. The hill is surrounded by semideciduous and evergreen forest patches. Unfortunately the region is now under disturbance due to govt sponsered hill township projects. The wall itself may become out of reach for common man as a private township is being planned around the structure.
 

 

<
Endangered region, Lohgad fort, Maharashtra, Pune district, Jan 2011
Habitat : Farmhouses replacing the evergreen forest
पुणे जिल्ह्यातील पवना मावळात लोहगड आहे. एके काळी सदाहरीत रानात वसलेला हा गड कोकणातुन घाटावर येणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी असलेली महत्वाची चौकी होती. या गडाचा इतिहास सातवाहनांपासुन सुरु होतो व पेशवेंपर्यंत येउन थांबतो. वाढत्या शहरीकरणाची झळ व फार्महाउस व पर्यटन शाळांची गर्दी गडाच्या पायथ्यापर्यंत येउन पोहोचली आहे. येथील प्रवेशदाराकडील दरवाजा व बुरुज बांधकाम पहाण्यासारखे आहे. वर पोहोचल्यावर उत्तरेकडे तोंड असलेली ही कमान अप्रतिम आहे. एका बाजुस मशिद, दुसऱ्या बाजुस भगवे निशाण, समोर ध्रुव तारा व त्याच्या भोवती पिंगा घालणारे तारे असा हा नजारा आहे. (पृथ्वी फिरताना त्याचा अंश ध्रुव ताऱ्यातुन जात असल्याने, इतर तारे ध्रुव ताऱ्याच्या भोवती पिंगा घालत आहे असा आभास होतो. वास्त्तवात मात्र तारे स्थिर आहेत.)
The fort of Lohgad is located west of Pune. Lohgad literally means fort of iron. Built in 200 BC by Satawahan dynasty, it was active check fort located on the deccan platue till middle of 19th Century. The arch at the entrance as can be seen here in the image was oriented facing north. As I wandered to this place in last monsoon, the frame with the arch was in my mind. Here in this image the lone tree on the Rock fort at the distance, with the north pole star just at the opening above the arch, was framed keeping in mind also the position of mosque at left and the Saffron flag on right. The image was made with composition of about 100 frames with 30 sec exposure each, using tripod and auto cable release. The backlight is due to Pune-Mumbai Expressway which passes by northern valley of this mountain. The flag was lit by the LED torch. The startrail is amazing form of photography with many unexplored frame possibilities.
 

 

<
Anting behaviour - Short toed snake eagle, सर्पगरुड, dry grassland and semidesert region, Maharashtra, Pune district, February 2011
Behaviour : Anting
पक्षि निसर्गाशी मिळतेजुळते घेतात याचे हे एक उदाहरण आहे. हा सर्पगरुड जमिनीवरिल मुंग्याचा वापर करुन आपल्या पंखांवरच्या इतर सुक्ष्मजीवांचा नाश करतो.
The anting as they call it as, is a behaviour of a bird to use ants for their benefit to eliminate parasites from their body. Here the short toed snake eagle is seen acting anting.
 
<
Common Indian Macaque, western ghats, Pune district, Maharashtra, India
वरंधा घाटात काढलेले हे छायाचित्र आपल्याला बरेच काही सांगुन जाते. आपण लहानपणापासुन पहात आलोली ही माकडं घाटातच का दिसतात ? घाट/सह्याद्री महत्वाचा आहे का ? रानात रमणारी माकडे रस्त्यावर का येतात ?
Often I see the photographers understimating the Canon 100-400 f4-5.6 mm zoom lens. This image was taken in bad light with good stable support. It shows the potential of this lens from the close distance.


Contact me at kale_v@rediffmail.com for any queries and suggestions.

 

/ Vivek Kale Nature Photography
 

 
 


 

निसर्ग चित्रमाला (भाग - २)
Nature Photography - Journal (2)
May 2011
Please use minimum 1280 pixel horizontal screen resolution for viewing. Please be patient while all the images in webpage are loaded.
Please do not use the images for any commercial use without permission. Text in Marathi and English is not exact translation.
 
चैत्र महिन्यात उन्हाळा मी म्हणु लागतो. सह्याद्रीचा माथा तापु लागतो. पावसाळ्यात धबाबणारे ओढे इवलेसे झरे होतात. कातळात कुठे नैसर्गिक कुंडे पाण्याने भरलेली दिसतात. त्यात गळालेली पान, काड़्याकुड़्या, मेलेले पतंग असे बरेच काही आढळते. रानातली स्थायी पाखर उन्हाळ्यात पाण्याभोवती जमा होतात. एखाद़्या पाझराच्या वहात्या पाण्यात आळीपाळीने आपली अंघोळ व तहान भागवतात. डबक्यातल्या पाण्यापेक्षा हे पक्षी, या वहात्या पाण्याला पसंती देतात. भुत्या, मोनार्क मात्र डबक्यात डुबकी मारण्यास पसंत करतात. लहान पाझरात त्यांना डुबकी मारता येत नाही. कस्तुर मात्र पाण्याच्या अवती भोवती किडे पकडण्यात रमलेला दिसतो. रानातले पाणी व उकाडा याचा अंदाज घेत हिवाळ्यात सह्याद्रीत रमलेले बरेच पक्षी उत्तरेस हिमालयाकडे कुच करतात. तर स्थानिक रानपक्षी रानातल्या पाण्यावर उन्हाळा काढतात. जसजसे झरे वाळत जातात तसा त्यांचा मुक्काम बदलत जातो.
The large waterfalls and streams in monsoon turn into small streamlets in winter. In summer these streamlet get converted in to small stagnant water holes with few drizzles. Often it is seen that the forest birds are interested in this flowing water. It is more cooler and cleaner than the large open stagnant waterholes. Small birds like crimson backed sunbirds look for thin layers of water films which pass over the rocks. The others like green leaf warblers and brown cheeked fulvettas are bold enough to take bath in the small water puddles (about ½ inch deep). Likes of black napped monarch, Paradise flycatcher etc however never indulge in standing in the puddle. These birds directly take deep in the large water puddles by diving from nearby branch and return back to the bush. Often these birds are seen bathing for the purpose of cooling themselves from the heat. These small water holes and driplets are extremely important for many forest birds.
 

 

<
Phylloscopus trochiloides, Greenish Leaf Warbler (nitidus), हिरवट वट्वट्या, Under growth of evergreen forest, western ghats, Maharashtra, Raigad district, March 2011
 
हा एक लहान चिमणीच्या आकाराचा लहान पक्षी आहे. याचा आकार अंदाजे १०-११ से.मी. असतो. वट्वट्या जातीत बरेच विविध प्रकारचे पक्षी आढळतात. या उपजातींमध्ये फार कमी फरक असतात. त्यामुळे नवख्याला वट्वट्या एवढे कळते, मात्र नक्की कोणता वट्वट्या हे सांगता येत नाही. आपल्याकडे हिवाळ्यात हमखास आढळणारा हिरवट वट्वट्या. हिरवट वट्वट्या उन्हाळ्यात हिमालयात ३००० मीटर उंच प्रदेशात, रहातो. उन्हाळ्यात त्याचा विणीचा हंगाम असतो. हिवाळ्यात मात्र तो हिमालयातुन दक्षिणेस स्थलांतर करतो. हिवाळ्यात तो मध्य व दक्षिण भारतातील सर्व जंगलांमध्ये आढळतो.
This is a small sized bird, called as warblers. There are many species of warblers. The differences between the species is minor or hidden. This often causes confusion in the mind of bird watcher. The details are important to identify the warblers. Sulphur bellied warbler, green leaf warbler, and many more. Most of the warblers which are seen in forest are long distance migrants. Often seen in a group, these birds come to waterhole in a group mainly for cooling themselves. Same individuals are seen repeatedly coming to water puddles for bath. ( the call by Stuart Fisher - Xento-Canto.org )
 

 

<
Phylloscopus trochiloides, Greenish Leaf Warbler (nitidus),हिरवट वट्वट्या, Under growth of evergreen forest, western ghats, Maharashtra, Raigad district, March 2011
Habitat : Evergreen forests, occasional
रानात तो एकटा किंवा गटागटाने फिरताना दिसतो. त्याच्या पाठीवर हिरवट करडा रंग असतो. पंखांवर पांढरट लहान रेघ असते. डोळ्यावर पिवळट भुवई समान खुण असते. पाणवठयावर हे पक्षी गटागटाने अंघोळ करणयास येतात. उन पडताच उकाड्यावर मात करण्यासाठी त्यांची चाललेली धावपळ पहाण्यासारखी असते.
The greenish leaf warbler is common warbler seen in well wooded areas in Central and South India in winter. It is a migratory bird. It size is about 11 cm. These birds breed in Central asia and Himalayas in North India. It has a single bar on its wings. It is greenish above with whitish yellow supercilium. These birds are seen in small group. Around the waterholes in undergrowth of evergreen forest.
 

 

<
Luscinia brunnea brunnea, Indian blue Robin female ,निळा चीरक, evergreen forest undergrowth, Maharashtra, Pune district, March 2011
Habitat : Evergreen forest, rare (passage migrant)
निळा चीरक हा पक्षी क्वचितच सह्याद्रीत दिसतो. निळा चीरक उन्हाळ्यात हिमालयात ३००० मीटर उंच प्रदेशात, रहातो. उन्हाळ्यात त्याचा विणीचा हंगाम असतो. हिवाळ्यात हा पक्षी थेट श्रीलंका गाठतो. काही पक्षी केरळ मध्ये विसावतात. हिवाळा संपला कि हे पक्षी मजल दरमजल करत पुन्हा हिमालय गाठतात. त्यांच्या या दुरच्या प्रवासात ते सह्याद्रीत थांबतात. या अशा प्रकारास पॅसेज मायग्रंट म्हणतात. नर पक्षी अत्यंत रंगीत असतो. प्रवासात तो मादी बरोबरच असेल असे नाही. नर हा पाठीकडे निळा व पोटाकडे तांबुस असतो. डोळ्यावर सफेद भुवई समान खुण असते. मादी मात्र फिकट हिरवट तपकिरि असते. छातीकडे झालर असते.
Indian Blue robin is seen in western ghats, during its passage while on the migration from Himalayas to Srilanka/South Indian evergreen forests or vice versa. The female Indian blue robin is olive brown above and buff below with a light eye-ring. The breast and flanks of female are buffy as shown in the image. The adult male has blue upperparts, white supercilium and rufous underparts. This small blue throat sized bird is seen in dense evergreen forest undergrowth of south western ghats and Srilanka in winter. These birds migrate back to Himalayas in April. This is an insectivorous bird. It skulks in undergrowth and hops on the ground. ( call by Sander Bot - Xento-Canto.org)
 

 

<
Luscinia brunnea brunnea, Indian blue Robin female ,निळा चीरक, evergreen forest undergrowth, Maharashtra, Pune district, March 2011
Habitat : Evergreen forest, rare (passage migrant)
सदाहरित जंगलात आढळणारा हा पक्षी जंगलाच्या पानगळीत किडे शोधुन खाण्यात गर्क असतो. महाराष्ट्रातील सदाहरित जंगलात हा पक्षी हिमालय ते श्रीलंका या प्रवासात थांबतो, का तो हिमालयातुन येउन इथेच सह्याद्रीत रमतो, हा एक चांगला अभ्यासाचा विषय आहे. तसेच श्रीलंकेत आपल्या कडील जंगलापेक्षा नक्की काय या पक्ष्याला आकर्षित करते, हे एक गुढ आहे.
During the migration often the male and female are not seen together indicating different migration pattern amongs themselves. A detailed study about their migration status in North western ghats (passage migrants or winter migrants) needs to be done.
 

 

<
Birds around Pune, Maharashtra, Pune district
Habitat : semi deciduous and evergreen forest and dry grassland/arid region
पुणे शहर भौगोलिक द्रुष्ट्या महत्वाच्या ठिकाणी वसले आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात डोंगराळ भागात पाणगळीची वने आहेत. कोकणाकडे उतरणाऱ्या वाटांवर तुरळक सदाहरित जंगले आहेत. जिल्ह्याच्या पुर्वेस ओसाड वाळवंटी प्रदेश आहे. या भागात तुरळक गवताळ माळराने आहेत. या व्यतिरिक्त शहरात व इतरत्र पाणथळ जागा आहेत. या विविध अधिवासांमध्ये रहाणारे स्थानिक व बहुधा हिवाळ्यात येणारे स्थलांतर करणारे पाहुणे पक्षी असा सर्व थाट पाहुन आपल्या जिल्ह्याची जैविक विविधता समजुन घेता येउ शकते. माळराने, सदाहरित जंगले, पाणगळीची वने व पाणथळ जागा हे सर्व अधिवास समान महत्वाचे असतात हे जाणुन घेणे महत्वाचे आहे.
Pune is located at the junction of various habitats. On the west, the district has patches of semideciduous forests in hills around western ghats on deccan platue. It also has some remains (patches) of evergreen forest along the main ridge of western ghat. On the south and eastern sides of city the dry rocky hills and arid grasslands habitat exists. The main rivers and shallow waterbodies around Pune offer excellent habitat for the winter migrant waterbirds. On all the sides, the city, it is expanding at very rapid rate, posing threat to these habitats.
 

 

<
Startrail at Harishchandragad with backdrop of evergreen forest, North western ghats, Maharashtra, Pune district, Apr 2011
Habitat : evergreen forest patches
भर उन्हाळ्यात सुद्धा माथ्यावरच्या सदाहरित रानात गारवा होता. रानातील सर्व झाडे चैत्रपालवी ची नुतन हिरवी शाल पांघरुन डोलत होती. त्यात पोपटी, हिरवा, गर्द हिरवा, अधुन मधुन पिवळ्या तांबुस रंगाच्या अनेक छटा होत्या. उन्हामुळे बहुतेक सर्वच पाण्याचे झरे वाळले होते. उन्हातली कारवी वाळुन पिवळी झाली होती. तर सावलीत मात्र कारवी छान हिरवीच होती. उन्हामुळे वाळ्क्या ताठर कारवीचा दर्प पसरला होता. संध्याकाळ होताच पश्चिमेला क्षितिजावर सुर्याचा ढग व धुरकट वातावरणावर रंगसोहळा पार पडला. अल्याड पल्याड च्या सुळक्यांनी त्यात आपली रुद्र प्रतिमा दाखवली.
The sky theater at Harishchandragad showed a spectacular star show on the day of new moon.
 

 

<
Kalbhairav pinnacle, Pinnacles of North western ghats, Harishchandragad, Maharashtra, Pune district, Apr 2011
Habitat : Evergreen forest patches
काळ्भैरवाचा सुळका कोकणकड्याच्या दक्षिण टोकावरुन दिसतो. कड्याच्या या भागात माथ्यावर कड्याकडे झुकणारा उतार असल्याने, फक्त कोरड्या हवामानातच जाता येते. या छायाचित्रात माळशेज घाटावरचे पठार, माळशेज डोंगर रांग, भैरवगड, दुर मागे घाटघर रांग, व तळ कोकणातला शेतजमिनींवरचा भाजवळीचा धुराळा दिसत आहे. सुळक्याच्या डोंगराच्या खांद्यावर लहानसे सदाहरित रान आहे. भर उन्हाळ्यात सुद्धा माथ्यावरच्या सदाहरित रानात गारवा होता. रानातील सर्व झाडे चैत्रपालवी ची नुतन हिरवी शाल पांघरुन डोलत होती. त्यात पोपटी, हिरवा, गर्द हिरवा, अधुन मधुन पिवळ्या तांबुस रंगाच्या अनेक छटा होत्या. उन्हामुळे बहुतेक सर्वच पाण्याचे झरे वाळले होते. उन्हातली कारवी वाळुन पिवळी झाली होती. तर सावलीत मात्र कारवी छान हिरवीच होती. उन्हामुळे वाळ्क्या ताठर कारवीचा दर्प पसरला होता.
This image of kaalbhairav pinnacle is taken from southern edge of konkan kada. This region of konkan kada can be reached only in the dry season due to inclination of the top platue over the cliff. The malshej ghat, bhairavgad and range beyond can be seen here. Most of the small patches of evergreen forest have lasted in Maharashtra due to almost impossible reach for a common man to these isolated pinnacles and hills around.
 

 

<
Startrail from Konkankada, Maharashtra, Pune district, Apr 2011
Habitat : Stars and Pinnacles
आकाशाचा मंच ताऱ्यांच्या रोषणाईने सजलेला पहायचा असेल तर शहरापासुन दुर जावे लागते. प्रकाशाचे प्रदुषण नसलेल्या एखाद्या भागात. अमावस्येच्या रात्री तर यात मजा औरच असते. संध्याकाळ होताच पश्चिमेला क्षितिजावर सुर्याचा ढग व धुरकट वातावरणावर रंगसोहळा पार पडला. अल्याड पल्याड च्या सुळक्यांनी त्यात आपली रुद्र प्रतिमा दाखवली. बघता बघता अंधार दाटुन आला, आकाश असंख्य ताऱ्यांनी उजळुन निघाले. नेहेमी प्रमाणे सर्व ताऱ्यांनी ध्रुव ताऱ्याभोवती पिंगा घालण्यास सुरुवात केली. संध्याकाळी नियोजनाप्रमाणे सेट केलेल्या कॅमेऱ्याने, उत्तर व पश्चिमेला सामावुन घेणारे तिनी सांजेपासुन रात्री पर्यंत चे चित्र टिपले. आकाशात फक्त तारे नव्हे तर बऱ्याच इतर गोष्टी दिसत होत्या. कड्याच्या कडुन दुर कोण्या पक्ष्याचा किंचाळ्ण्याचा आवाज येत होता. अधुनमधुन पाकोळ्या हवा कापत दचकवत होत्या. आकाशात मुंबई कडे झेपावणाऱ्या विमानांचा ट्रॅफिक जॅम लागला होता. एका मागे एक रांग लावुन उतरणारी विमाने आकाशाला जिवंत करत होती. आळे फाट्यावर आकाशात सुद्धा आळे फाटा आहे हे कळाले. या ठिकाणी नंबर न लागलेली विमाने दक्षिणेला वळतात व एक फेरा मारुन पुन्हा रांगेत येतात असे आढळुन आले. (पृथ्वी फिरताना त्याचा अंश ध्रुव ताऱ्यातुन जात असल्याने, इतर तारे ध्रुव ताऱ्याच्या भोवती पिंगा घालत आहे असा आभास होतो. वास्त्तवात मात्र तारे स्थिर आहेत.)
The sky theater at Harishchandragad showed a spectacular star show on the day of new moon. The haze on the western horizon was lightened by the setting sky for long time. The haze is mainly due to fires lit in agricultural fields by farmers in konkan platue. This tradition of burning the unwanted plants in field in summer is extremely polluting to the atmosphere and an alternative less polluting system to achieve the cleaning of fields needs to be found. The stars circles around the north star as usual. The pinnacles of Nhapta and kaladgad are lit due to backlight of the civilisation beyond. The composition and camera settings were finalized at sunset time with coverage of both north and west directions. (thanks to the compass by Sam) After sunset the light played its drama with haze for about an hour, before it got really pitch dark. The image was made starting with faded haze light till the appearance of stars on backdrop of west sky (about 1.5 hours duration). After about an hour after sunset, there was pitch darkness at the cliff with occasional wind cutting noise of martins. Strange creepy crickets and other insects gathered around us. Occasional bird cry from the valley below made us raise our ears. Along with hundreds of stars, many satellites and aeroplanes could be seen in the sky. One of the aeroplanes which we saw, one almost projected its lights towards us, making us wonder what is coming for us from the sky. After having good experience we returned back to the caves for dinner.
 

 

"Nalichi vaat", tube route, Harishchandragad, Maharashtra, western ghats, India
कोकणकड्यावरुन हिवाळ्यात व उन्हाळ्यात स्पष्ट नजारा दिसतो. कड्याच्या बाजुने असलेली पायवाट या कोरड्या दिवसात सहज पायाखाली घालता येते. कड्याच्या दक्षिण भागातुन घेतलेले हे चित्र, समोर कोकणकडा, त्याबाजुला कोंबडा, नाप्ता व कलाडगड चे सुळके दिसत आहेत. खोल दरीतुन तब्बल ५०-६० अंशात असलेली नळीच्या वाटेची उभी चढण (२००० फीट) दिसत आहे. पावसाळ्यात या नळीतुन पाणी वहाते, तर उन्हाळ्यात व हिवाळ्यात येथुन धाडशी व जिद्दी गिर्यारोहक वर चढतात. सह्याद्रीतल्या अवघड समजलेल्या जाणाऱ्या ट्रेक पैकी हा एक.
From Konkan kada one gets clear view of Konkan platue in winter and summer. Also the complete trail (about 1 km) along the konkan kada edge is possible only in winter and summer. The image is made from the southern edge of konkankada. As can be seen in image, the most difficult route to climb Konkan kada/Harishchandragad via a route along the grrove (water flow passage) can be seen. This trek is one of the toughest endurance treks in Sahyadris. One has to climb almost 2000 feet along a narrow tube with gradient of about 50 degree, at a stretch. (about 10 hours)
 
<
Napta, Kombda and kaladgad pinnacles, Pinnacles of North western ghats, Harishchandragad, Maharashtra, Pune district, Apr 2011
..
..
 


Contact me at kale_v@rediffmail.com for any queries and suggestions.

 

/ Vivek Kale Nature Photography
 

 
 


 

निसर्ग चित्रमाला (भाग - 3)
Nature Photography - Journal (3)
June 2011
Please use minimum 1280 pixel horizontal screen resolution for viewing. Please be patient while all the images in webpage are loaded.
Please do not use the images for any commercial use without permission. Text in Marathi and English is not exact translation.
 
पाणगळीची जंगले, सदाहरित जंगले, समुद्राजवळची खारफुटीची जंगले, लहान देवराईची वने, माळरानावरची गवताची कुरणे, पाणथळ जमिनी हे सर्व अधिवास विविध प्रकारच्या प्राण्यांसाठी व पक्ष्यांसाठी महत्वाचे असतात. औद्योगिकिकरण, शेती, रस्ते, लोहमार्ग, शहरीकरण, खाणकाम, विद्युत प्रकल्प, धरणे, अशा प्रत्येक मानवनिर्मित कारणांमुळे या सर्व अधिवासांवर वाईट परिणाम होताना दिसतो. प्रगतीच्या व्याख्येत माणसाने निसर्गसंपत्तीच्या प्रगतीचा सहभाग करुन घेणे महत्वाचे आहे.
Forests in Maharashtra has reached very sad state. Beyond the deciduous forests and evergreen forests, the other habitats like grasslands, wetlands etc are in further more trouble. Most of the damage to the forests and habitats in western districts is infact directly and indirectly done by the governement itself. The main causes for the trouble are very obvious. Mining Industry, Land development activities, more urge for agricultural activities, power generation activities, private town developments, industrial development, surface transportation etc. are the main culprits for the unnecessary and possibly ireversible damage to the Natural wealth. Though we as a human race are loosing the battle against our own greed, there is a small hope that due to international pressure the situation may turnaround in India. As the International community works hard to control green house gases emission, we need to preserve the lungs of the universe, the forests and important habitats.
 

 

<
 
Growth of human interference in evergreen forest, western ghats, Maharashtra, Pune district, May 2011
 
सदाहरित जंगल हे सह्याद्रीच्या रांगात तुरळक प्रमाणात आढळते. पुणे व मुंबई या मोठ़्या शहरांच्या जवळ मात्र रस्ते बांधणी, लोहमार्ग, औद्योगिकरण यामुळे सदाहरित रानाचा ऱ्हास झालेला दिसतो. माणसाला प्रगती करायची असेल तर थोडे जंगल तोडावे लागणार अशी समजुत घातली जाते. दुर्दैवाने सर्वच भागात औद्योगिकरण, शेतीकरण या प्रकारांमुळे सह्याद्रीच्या सर्वच भागात पुणे-मुंबई पद्धत दिसु लागली आहे. दुर्गम भागात बनणाऱ्या नविन रस्त्यांमुळे शहरी संस्कृती तेथे येऊ लागली आहे. ध्वनी, जल व हवेचे प्रदुषण वाढु लागले आहे.
The remains of evergreen forest can be seen in Maharashtra along the western ghats. Most of the larger patches are intact due to the remoteness of the zones from major urban centers like Pune and Mumbai. But as the road infrastructure is improving these remote areas are now accessible to the outsiders, inviting the trouble to the forest patches. The religious pligrims, candid tourists, passing traffic, and even the local and migratory people are slowly eating into the forest. The image here shows the traffic in the remote evergreen forest patch in Pune district. The light, noise and air pollution due to roads in forest not only disturb the wildlife but also sometimes destroy the fundamental requirements of some wild species. The broken forest canopy in such forests due to wider roads will damage the survival of the aboreal animals, such as Rafuca Indica.
 

 

<
 
Leptocoma minima, Small sunbird, crimson backed sunbird female, छोटा शिंजिर, evergreen forest, western ghats, Pune district, India
Habitat : Evergreen forests
 
छोटा शिंजिर हा सदाहरित रानातला स्थानिक व पश्चिम घाटाच्या बाहेर न आढळणारा लहान पक्षी आहे. याचा आकार ८ से.मी. असतो. काही मोठ्य़ा फुलपाखरांएवढा. अत्यंत लहान रानफुलांमधुन तो मध टिपतो. याच्या लहान आकारामुळे, त्यास पाण्याच्या लहानशा डबक्यात सुद्धा अंघोळ करता येत नाही. तो दगडातल्या पातळ पाझरांवर अंघोळ करताना दिसतो. पाणी पिताना तो पाण्यातल्या एखाद्या वनस्पतीच्या खोडावरुन पाय रोवुन पाणी पितो. पाण्यात उतरण्याच्या भानगडीत पडत नाही. नर रंगाने पाठीकडे तांबडा तर डोक्याकडे जांभळा असतो. मादी मात्र फिक्या हिरव्या रंगाची असते.
The tiny bird called as crimson backed sunbird or small sunbird is seen in evrgreen forests in western ghats. It is a endemic bird of this region. The word endemic means the one who is not seen outside the region. So in this case this bird is seen only in wetsern ghats, so it is called as endemic to western ghats. The size is very small about 8 cm, which is smaller than some of the large butterflies. Due to its small size it is also called as small sunbird.The bird is seen collecting the nectar from very tiny flowers, often not used by the other sunbirds, like crimson sunbird. This bird often finds very difficult to take bath in water streams or water puddles. It looks for the plant stem which is in the middle of water. It stays on the stem and then drinks the water from the puddle. But in Summer when it gets hot, it is often seen desparate to take bath. It uses the small water drops falling from the rocks above, to take a shower. Otherwise it is seen bathing and cooling in the thin water layers which drizzle along the rocky surfaces. This suits these birds, as they do not get fear of drowning in such case. It leans on the rocks to get its lower boddy and face wet. The male bird has beautiful crimson color on the back. The female however has greenish plumage with small crimson patches on her body.
 

 

<
 
Leptocoma minima, Small sunbird, crimson backed sunbird female, छोटा शिंजिर, evergreen forest, western ghats, Pune district, India
Habitat : Evergreen forest
.
.
 

 

<
 
Megalaima haemacephala, Coppersmith Barbet, तांबट, semideciduous and evergreen forest, near western ghats, Maharashtra, Pune district.
Habitat : semideciduous and Evergreen forest
 
तांबट हा एक लहान आहाराचा फलाहारी पक्षी आहे. नर व मादी तांबट हे सारखेच दिसतात. मात्र कमी वयाचा तांबट मात्र रंगभुषेत थोडा वेगळा दिसतो. तांबट पक्ष्याच्या कपाळावर व छातीकडे लाल रंग असतो, तर त्याच्या डोळ्याभोवती व गळ्याकडे पिवळा रंग असतो. मुख्यता हिरव्या रंगाच्या या पक्ष्यास पोटाकडे पिवळ्या रेशासमान खुणा असतात. वसंत ऋतुत हा पक्षी फळझाडांवर हमखास आढळतो. त्याला हिंदीत बसंत म्हणतात. तांब्याच्या भांड़्यांचे काम करणारे तांबट जसा आवाज करतात तसा याचा आवाज. म्हणुनच याला तांबट म्हणतात.
Coppersmith Barbet, Megalaima haemacephala is a small frugivorous bird. The adult male and female look alike. However the juvenile bird look different. The adult bird has crimson forehead and crimson breast patch. The bird has yellow patch below and above the eye, and on the throat. The bird is grass green with yellowish streaked underparts. Its feet are reddish. The juvenile bird however is similar to the adult bird except the crimson patches. In hindi it is also called as Chota Basant, as it is actively seen in Basant, the late spring. In Gujrathi it is known as "Tuktukiyo" for its coppersmith like call. (Call by Mike Nelson - xento-canto.org)
 

 

 
Megalaima haemacephala, Coppersmith Barbet, तांबट, semideciduous and evergreen forest, near western ghats, Maharashtra, Pune district.
Habitat : semideciduous and evergreen forest
.
.
 
 

 

<
 
Common map, North western ghats, Maharashtra, Pune district, Apr 2011
Habitat : evergreen forest patches
 
.
.
 

 

<
 
evergreen forest - origin of river, North western ghats, Maharashtra, Pune district, Apr 2011
Habitat : evergreen forest patches
 
आजच्या प्रगत माणसाने आपल्या डोळ्यांवर झापडे घातली आहेत. शहरात नळाला येणारे पाणी, आपल्याला कुण्या जलाशयातुन मिळते. या जलाशयात पाणी नदीतुन येते. पावसाळ्यात या नद़्या डोंगरातुन धबाबतात. पठारावर येताच धरणात आडवल्या जातात. पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व नद्यांचा उगम सह्याद्रीच्या रांगात होतो. येथील जंगलातुन हे स्वच्छ पाणी धरणात येते. दुर्दैवाने या पाण्याच्या मुळ स्त्रोताच्या जवळ प्रदुषण वाढत चालले आहे. या सर्व बाबींकडे आपण डोळे उघडे ठेवुन पाहणे महत्वाचे आहे.
If we look at Nature with different perspective, we find that actually managing the Natural wealth is not difficult. But often due to lack of education, we realise that Natural wealth is lost. Beautiful landscapes are turned in to polluting wastelands. Forests, water sources, air, land, and all the ecosystems which support the living organisms on the earth are equally important. In this image one can see a beautiful evergreen forest, and a small water puddle in the water stream in Sahyadri. Both are important and need to be preserved.
 

 

<
 
Stars and forest, North western ghats, Harishchandragad, Maharashtra, Pune district, Apr 2011
Habitat : Evergreen forest patches
 
पश्चिम महाराष्ट्रात जंगलांचे तुकडे झाले आहेत. सलग जंगले नाहीत. कोयना-राधानगरी सोडता, इतरत्र जंगलांचे तुकडे झाले आहेत. रानगवे, वाघ, बिबटे व अस्वले यांसाठी जंगलांची सलगता महत्वाची असते. कोकणातुन घाटावर य़ेण्यासाठी रस्ते, दुर्गम भागातील मानवी वस्ती, व जंगलाचा ऱ्हास यामुळे हि वेळ आली आहे.
For the large population of mammals to survive, we need large continuous forests, without himan interference. Unfortunately we have lost such forests long back, in western Maharashtra. Once upon a time these forests were occupied by mammals like Indian tiger, sloth bears, and leopards. Due to segmentation of the forests into small patches, today though we see some good samples of forests, the mammals are missing. Human interference reduced the survival possibilities of the mammals.
 

 

<
 
Tung fort, western ghats, Maharashtra, Pune district, May 2011
 
जलसागराच्या लहान लाटांचा सौंम्य आवाज, दुर डोंगरांना वळसा घालत येणारी ढगांची माळ, पावसाळ्याचे वेध लावणारा वारा, हे सर्व मनाला सुख देउन जाते. चार किल्यांच्या मध्ये असणाऱ्या पवना जलसागराच्या समोरचे हे चित्र. उंच आकाशाला भिडणारे शिखर असणाऱ्या घुमटागत तुंग गडाचे रुप रांगडे आहे. कोण्याही माणसाला भावणारे त्याचे रुप, मात्र दुखावले आहे. गडाच्या खांद्यावर कोण्या धनाड़्य खाजगी मंडळींनी धनाड़्य पर्यटकांसाठी महाल बांधले आहेत. याला काही लोक रिसॉर्ट म्हणतात. जवळच असलेल्या सदाहरित देवराईचे दिवस भरले हे नक्की झाले आहे.
As the small waves lashed the shores, clouds appeared from behind the distant hills. Due to premonsoon wind and clouds, temperature has dropped with steady rise in humidity. The manmade reservoir of water in the middle of 4 historic fort mountains of Tung, Tikona, Lohgad and Visapur is beautiful. The lake is surrounded by small evergreen forest on one side. The other three sides however are occupied by human habitation, private bungalows. The well preserved landscape has been recently disturbed by private resort on Tung fort. Slowly the others will follow. The water reservoir itself will be polluted in the process. The nearby forest will be disturbed. The resort is being built by a well known corporate house of India, known for its values. Unfortunately today, the values are changing, and have lost the way. This landscape was one of the best in Pune district.
 
<
 
The startrail at Tung, in Pawana maval, Pune district, Western ghats, Maharashtra, India
 
वरिल चित्रात, तारे सुरेख रेघा ओढताना दिसत असले तरी, तुंग सारख्या अप्रतिम सुंदर डोंगराच्या खांद्यावर नविन खाजगी पर्यटन केंद्र बांधल्यामुळे, या भागाचा कायापालट होऊन येथे शहरीकरणाची सुरुवात झाली आहे. य़ा किल्याच्या एका बाजुस अप्रतिम सदाहरित देवराई आहे. या देवराई चा टिकाव यापुढे लागणार का ? याचे उत्तर काळच सांगु शकेल. याच डोंगररांगेच्या मागच्या बाजुस डावीकडे दिसणारा उजेड अशाच एका मोठ़्या अब्जावधी डॉलर खाजगी वसाहतीचा आहे.
As can be seen in the picture above, even the stars have lost their shine, infront of the superlights put by private resort, in the middle of wilderness. The glow of clouds on left is due to anaother billion dollar private township beyond the hills.
 


Contact me at kale_v@rediffmail.com for any queries and suggestions.